सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्या पाचजणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । खंडाळा। शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये सिगारेट ओढल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरवळ पोलीसांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित,पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर,अमोल जगदाळे,स्वप्नील दौंड यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना शिंदेवाडी येथील लॉकीम फाट्यालगत जुन्या औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी त्याचप्रमाणे शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीसमोर,भोर-शिरवळ जाणाऱ्या रोडवरील हॉटेल मांडवलीसमोर,शिंदेवाडी फाट्यालगत मातोश्री चायनीज दुकानासमोर सार्वजनिक ठिकाणी संजय विजय कोळी ( वय १९,रा शिंदेवाडी ता.खंडाळा),आकाश सदाशिव वाघ (वय २४,रा.वेताळ चौक,शिरवळ ता.खंडाळा),शंभूराज मच्छिन्द्रनाथ जेधे (वय २०,रा. देवघर पुनर्वसन ता.खंडाळा),शरद नथुराम महांगरे (वय ५२रा.विंग ता.खंडाळा),अमीर हैदर खान (वय २७,रा.शिरवळ ता.खंडाळा) हे सिगारेट ओढत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल जगदाळे,स्वप्नील दौंड यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर,संजय पंडित हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!