राज्यात गायी-म्हशीचं दूध २ रुपयांनी महागले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
राज्यात मंगळवारपासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

डिझेलच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार यामुळे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गायीचे दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये, तर म्हशीचे दूध ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणार्‍या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने दूध विक्री दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!