आचार्य अत्रे कट्टा शिवाजीपार्क येथे कार्यक्रम संवादासह वेशभूषा स्पर्धा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । आचार्य प्र.के.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त येत्या १३ ऑगस्ट २२ रोजी अत्रेंच्या लग्नाची बेडी नाटकातील तीन ते पाच मिनिटांचा संवाद वेषभूशेसह (कॉस्च्युम सह) सादर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आचार्य अत्रे कट्टा, व आचार्य अत्रे समिती, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यान गणेश मंदिर, शिवाजी पार्क, दादर येथे सायंकाळी ५ ते ८ यावेळेत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन अशी पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजिका सौ.उमा बापट यांनी केले आहे. सहभागासाठी १) विसुभाऊ- ९८२१९०३८९० आणि २)ऍड. आरती – ९८६९५१२२०० यांच्या बरोबर संपर्क करावा, अशी विनंती आचार्य अत्रे कट्ट्याच्या वतीने करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!