कोरोना काळ:अर्थव्यवस्थेतील घसरणीनंतरही विदेशी गुंतवणूकदार भारतीय कंपन्यांत गुंतवताहेत पैसा


 


स्थैर्य, मुंबई, दि.८: रतातील ढासळती अर्थव्यवस्थाही विदेशी गुंतवणूकदारांचे हात बांधू शकली नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेबाबत आशा बाळगत ते शेअर बाजारात मोठा पैसा गुंतवत आहेत. याच विश्वासाच्या आधारावर विदेशी गुंतवणूकदारांनी आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत ऑगस्टमध्ये ४४,०७६ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. मार्चनंतर ही सर्वात मोठी खरेदी आहे. एवढेच नव्हे तर यादरम्यान चीन वगळता आशियाई क्षेत्रातील अन्य बाजारांतून पैसे काढले आहेत. भारतीय शेअर बाजार २०२० मध्ये क्षेत्रीय बेंचमार्क पिछाडीवर असला तरी लवकरच रुळावर येईल याबाबत गुंतवणूकदार आश्वस्त आहेत. विशेष म्हणजे एसअँडपी बीएसई सेन्सेक्सची कामगिरी जवळपास ६.५ टक्के अंकांनी पॅसिफिक इंडेक्सपेक्षा कमी राहिली. असे असतानाही विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय वित्तीय फर्म्स आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसीच्या शेअर विक्रीत मोठा सहभाग नोंदवला. या संस्थांनी गेल्या महिन्यात संयुक्त रूपात ३४,५९२ कोटी रु. जमा केले होते. न्यूयॉर्कच्या एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत कार्यरत नूनो फर्नांडिस म्हणाले, येत्या १२-२४ महिन्यांत होणाऱ्या कमाईच्या दृष्टिकोनातून आम्ही भारताला चीनसोबत अव्वल ठेवत आहोत. जीडीपीच्या आकडेवारीनुसार, जूनच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत विक्रमी २३.९ टक्क्यांची घसरण नोंदली आहे. तरीही विदेशी शुद्ध रूपात खरेदीदार म्हणून राहिले आहेत. एवढेच नव्हे तर सप्टेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत जवळपास १७०० कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवले आहेत. मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांकडून येणारा पैसा या विश्वासाचे प्रतीक आहे की, जीडीपीची खराब आकडेवारी झाली गेली गोष्ट आहे. लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर जुलैपासून आर्थिक हालचालीत सतत सुधारणा येत आहे. निधी व्यवस्थापक म्हणून एका आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत अमित गोयलही भारतीय बाजारांबाबत खूप सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. त्यांच्यानुसार, आम्ही दूरगामी भूमिका घेऊन चालत आहोत. आर्थिक हालचाली जसजशा सामान्य होतील तशी मागणी वाढेल. तसतसा भारतीय कंपन्यांना फायदा होईल. गेल्या तीन महिन्यांत खासगी बँका, कच्चा माल तयार करणाऱ्या कंपन्या आणि आरोग्य निगा फर्म्सचे शेअर खरेदी केले आहेत. मात्र, काही असेही आहेत, जे कोरोना प्रकरणे वाढल्याने साशंकही आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!