
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, पालघर, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील अकरा आरोपींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनासमोरचं आव्हान वाढलं आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या कैदेत असलेल्या 17 आरोपींपैकी 11 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सहा जणांचे अहवाल येणं बाकी आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्यांना क्वारंटीन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यानंतर पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून, या आरोपींच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून चाचणी घेण्यात येणार आहे. वाडा पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात येणार असल्याची माहिती वाडाचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
