बांधकाम कामगारांना केंद्राच्या मोफत जेवण योजनेसह अनेक योजनांचा मिळणार लाभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ मे २०२३ | फलटण |
केंद्र सरकार संचलित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित कामगारांना मोफत जेवण योजना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा गरजू कामगारांनी लाभ घेण्यासाठी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोफत जेवण योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, सद्गुरू हरीबुवा मंदिरासमोर, मलटण येथे सोमवार, दि. १५ मे २०२३ पासून दररोज सकाळी ८.३० ते ९.३० पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच माजी नगरसेवक अशोकराव जाधव (मोबा. ७६२०४०८००२) यांच्याशी संपर्क साधावा.

कामगारांनी मोफत जेवण घेण्यासाठी येताना आपला रिकामा डबा घेऊन येणे. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसाठी पात्र लाभार्थी पुढीलप्रमाणे असतील.

बांधकाम कामगार

गवंडी कामगार
बिगारी
हेल्पर
खोदकाम कामगार
प्लंबर
वेल्डर
फिटर
इलेक्ट्रिशन
सुतार
पेंटर
व एक इमारत किंवा घर उभे करण्यात जे कोणी लागतात ते सर्व कामगार.

सामाजिक सुरक्षा योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे :
१) पहिल्या विवाहासाठी ३०,०००/-
२) हत्यारे खरेदी ५,०००/-
३) सुरक्षा संच
४)अत्यावश्यक संच

शैक्षणिक मदत योजना (कामगारांच्या दोन मुलांना व पत्नीला)
१) १ ली ते ७ वी – दरवर्षी २,५००/-
२) ८ वी ते १० वी – दरवर्षी ५,०००/-
३)११ वी ते १२ वी – दरवर्षी १०,०००/-
४)१३ वी ते १५वी – दरवर्षी – २०,०००/-
५)१६ वी ते १७ वी – दरवर्षी – २५,०००/-
६) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी – १,००,०००/-
७)अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी – ६०,०००/-
८) एमएससीआयटीसाठी आवश्यक फी

आरोग्यविषयक योजना (संपूर्ण कुटुंबासाठी)

१) पत्नीस नॉर्मल डिलिव्हरीसाठी – १५,०००/-
२) सिझेरियन डिलिव्हरीसाठी – २०,०००/-
३) गंभीर आजार उपचारासाठी – १,००,०००/-
४) ७५% अपंगत्व आल्यास – २,००,०००/-
५) एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास – १,००,०००/-
६) व्यसनमुक्ती केंद्र उपचारासाठी – ६,०००/-

आर्थिक सुरक्षा

१) कामावर मृत्यू झाल्यास – ५,००,०००/-
२) नैसर्गिक मृत्यू झाल्यास – २,००,०००/-
३) घरकुल – २,००,०००/-
४) घर खरेदी किंवा बांधणीसाठी ६,००,०००/- रुपयांपर्यंतच्या कर्जाचे व्याज अथवा २,००,०००/-
५) मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी १०,०००/-
६) विधवा पत्नीस / विधूर पतीस प्रतिवर्षी २४,०००/- ५ वर्षांपर्यंत.
७) मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये
८) कामगार लाभार्थी यांच्यासाठी रोज मोफत जेवण दिले जाईल.

योजनांसाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड
रेशनकार्ड
बँक पासबुक
नियोत्याचे प्रमाणपत्र
वारसाचे आधारकार्ड
फोटो

नावनोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : माजी नगरसेवक अशोकराव जाधव (मोबा. ७६२०४०८००२)

बांधकाम कामगारांना सदर योजनांचा लाभ फत नावनोंदणी केल्यानंतर मिळणार आहे, याची दखल सर्व पात्र लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!