• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 20, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । मुंबई । मार्च – हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. तसेच, या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा मंत्री महोदयांनी करावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

“एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना रहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे रहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी. नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी,” अशा विविध मुद्द्यांवर जयंत पाटील यांनी आक्रमकपणे मतं माडंली.

“कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे,” असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.


Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

Next Post

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

Next Post

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!