
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा दि. 26 : राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मणिपूर येथे निधन झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी यादव कुटुंबियाचे सांत्वन करून धीर दिला. शासन स्तरावरून जी मदत लागेल ती करू असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार रोहिणी शिंदे, कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड, प्रशांत यादव, आर्वी येथील जेष्ठ गामस्थ आदी उपस्थित होते.

