स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आर्थिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे – जागतिक दहशतवादविरोधी परिषद आयोजित वेबिनारमधील मत

Team Sthairya by Team Sthairya
December 29, 2020
in इतर, देश विदेश, प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि.२९ : पैशांचा अवैध व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद विषयावर जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने वेबिनारचे आयोजन केले. दोन दिवसीय वेबिनारमध्ये शेवटच्या दिवशी सायबर क्षेत्रातील साधनांद्वारे जागतिक स्तरावर होणारे मनी लाँडरिंग आणि आर्थिक दहशतवाद, त्याची कारणे आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

मनी लाँडरिंगमुळे अर्थव्यवस्था, जागतिक सुरक्षा, सामाजिक दुष्परिणाम, नक्षलवाद, अवैध शस्त्रे, वाढती गुन्हेगारी, चॅरिटीचा पैसा दहशतवादासाठी वापरणे, कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर, काळा पैसा कायदेशीररित्या बाजारात आणणे, नेट बँकिंग अशा अनेक विषयांवर या परिषदेत विस्तृत चर्चा झाली.

श्रीलंकेचे विदेश सचिव प्रोफेसर जयनाथ कोलुंबग यांनी श्रीलंकेने दहशतवादाचा सामना कसा केला याचा इतिहास थोडक्यात सांगितला. दहशतवादाशी मुकाबला करताना भारताने सहकार्याची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रोफेसर कोलुंबग म्हणाले, दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नसल्याने संपूर्ण जगाने एकत्रितरित्या या विरोधात काम करणे महत्त्वाचे आहे. दहशतवादी संघटना मजबूत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक कुमक लागते ती देशांतर्गत व्यवहारातूनच उपलब्ध होत असल्याचे आढळून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेट बँकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर होणारा पैसा, डोनेशनद्वारे दिले जाणारे पैसे, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, इंटरनेटवर असणारे विविध ॲप त्याद्वारे होणारे पैशांचे व्यवहार अशा अनेक बाबी पैशांचा गैरव्यवहार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. कायद्यात पळवाटा शोधून गुन्हेगार निर्दोष सुटण्याची शक्यता असते. अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी यातूनही मोठ्या प्रमाणात पैसा जमा करण्यात येतो. दहशतवादी संघटना सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी कार्यरत असतात. पैसा हे त्यांचे मूळ शस्त्र असल्याने ते अवैधरित्या देशात वापरात येऊ नये यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. आर्थिक दशतवाद आणि ‘मनी लाँडरिंग’ ही समस्या एका देशाची नसल्याने सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात काम करणे गरजेचे असल्याचे प्रोफेसर कोलुंबग यांनी सांगितले.

दहशतवादी संघटनांचे जाळे जगभर पसरले आहे. याविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर कायद्याची चौकट आणि नियामक यंत्रणा यात सुसूत्रता असायला हवी जेणेकरून एका देशातील दहशवादाविरोधात लढताना दुसऱ्या देशाचे सहकार्य हवे असल्यास ते करणे कायद्याने सोपे व्हावे. भारत, श्रीलंका, फिलीपिन्स, आफ्रिका, अमेरिका अशा अनेक देशात दहशतवादी घटना घडल्या असून, नक्षली संघटनाही कार्यरत आहेत. यामागील समस्या आणि उपाय यावरही वेबिनारमध्ये शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चर्चा करण्यात आली.

यावेळी आफ्रिकन इंटेलिजन्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जसीम हाजी, इंटरपोलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मदन मोहन ओबेरॉय, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सायबर कायद्याचे तज्ञ डॉ. पवन दुग्गल, फॉरेन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी अधिकारी डॉ. स्टीफन कटलर, सायबर सुरक्षा तज्ञ जितेन जैन, फिलिपिन्सच्या इंटेलिजन्स आणि सुरक्षा अभ्यास सोसायटीचे अध्यक्ष प्रोफेसर रोमेल बॅनलॉय आदींनी सायबर जगतातील साधनांद्वारे होणारे मनी लाँडरिंग आणि त्यांचा सामना करण्यासाठी उपाय या विषयांबाबत मते मांडली. या सत्राचे सूत्रसंचालन संचालक प्रदीप गोडबोले यांनी केले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

विविध सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

Next Post

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांतून भरतीसाठी उत्तीर्णतेची गुणमर्यादा घटविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा

Next Post

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांतून भरतीसाठी उत्तीर्णतेची गुणमर्यादा घटविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.