भूमीअभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले; फलटणला आठवडाभरात दुसरी कारवाई


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी (वय ४९, रा. हिरवे बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. खेड, जिल्हा पुणे) यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सात हजार रूपयांची लाचेची रकम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी मुलाणी याने कोरेगाव (ता. फलटण) येथील तक्रारदारास मोजणी हद्द कायम करण्याकरीता दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

फलटण तालुयातील लाचलुचपत विभागाची आठवडाभरात ही दुसरी कारवाई असल्याने राज्य सरकारी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ह. नितीन गोगावले, पो.ह. निलेश राजपुरे, पो.शि. विक्रम कणसे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!