वनदेवशेरी कोळकीच्या प्रसाद नाळे यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | फलटण |
२०२३ मध्ये झालेल्या युपीएससी (सीडीएस) परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक ७३ मिळवून वनदेवशेरी (कोळकी) गावचे सुपुत्र प्रसाद विजयकुमार नाळे यांची भारतीय सैन्यदलामध्ये लेफ्टनंट (वर्ग – १) अधिकारीपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे प्रसाद यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.

ले. प्रसाद नाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांचा जाहीर नागरी सत्कार शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जि.प. शाळा वनदेवशेरी (कोळकी) येथे युवामित्र तरुण मंडळ व सर्व ग्रामस्थ, वनदेवशेरी यांच्याकडून होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!