इयत्ता ९ वी ते १२ वी शाळा सुरु मात्र विद्यार्थी उपस्थिती नगण्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि. २३ : शासनाने इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेवून आज दि. 23 नोव्हेंबर पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फलटण तालुक्यातील 80 माध्यमिक विद्यालयात एकुण 17 हजार 470 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी केवळ 2410 विद्यार्थी उपस्थित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. 

याचाच अर्थ कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पालक/विद्यार्थी शाळेत येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे आज पहिल्या दिवशी दिसून आले आहे.

फलटण शहर व तालुक्यात 80 माध्यमिक विद्यालये असून त्यामध्ये इयत्ता 9 वी मध्ये 5050 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी आज 745, इयत्ता 10 वी मध्ये 5233 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 1039, इयत्ता 11 वी मध्ये 3609 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 430 आणि इयत्ता 12 वी मध्ये 3578 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 196 म्हणजे इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये 17470 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी आज पहिल्या दिवशी 2410 विद्यार्थी वर्गात उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यासाठी प्रशासनाने पालकांची संमतीपत्रे लेखी स्वरुपात मागितली होती फलटण तालुक्यात 17470 विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी 4552 पालकांनी लेखी संमतीपत्रे दिली असली तरी विद्यार्थी उपस्थिती मात्र केवळ 2410 एवढीच असल्याचे आज पहिल्या दिवशी दिसून आले आहे.

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विनायक शिंदे

विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी वर्ग खोल्या व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्गात येणार्‍या विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी आणि त्यांना सॅनिटायझर वापरण्यास देण्याची व्यवस्था सर्व माध्यमिक विद्यालयांनी केली आहे.

दरम्यान सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यास सुचविण्यात आले होते त्यानुसार या वर्गांना शिकविणार्‍या 771 शिक्षकांपैकी 703 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 690 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले असून 11 शिक्षक कोरोना बाधीत आढळले आहेत, तर 350 कर्मचार्‍यांपैकी 336 कर्मचार्‍यांची चाचणी करण्यात आली त्यापैकी 301 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 4 जण कोरोना बाधीत आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे.

१२ ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहोळा समितीच्यावतीने त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील निवृत्तीनाथ मंदिर जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची भरीव देणगी

वास्तविक गेल्या 7/8 महिन्यापासून सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याने अनेक पालकांना ते शक्य नसले तरीही त्यांनी विद्यार्थ्यांना त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा परिस्थितीत इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे काय आणि आता शैक्षणिक वर्ष संपताना ऑनालईन आणि प्रत्यक्ष शिक्षण याचा मेळ घालताना या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी राहील याचा विचार करुन सुरु असलेली ऑनलाईन पध्दती सुरु ठेवण्याची आवश्यकता अनेकांच्या मनात असल्याचेच आजच्या विद्यार्थी उपस्थिती तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांना असलेली उपस्थिती व तेथील चर्चेतून स्पष्ट झाले असल्याने आता शासनाने ऑनलाईन पध्दतीच सुरु ठेवणे वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!