१२ ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहोळा समितीच्यावतीने त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील निवृत्तीनाथ मंदिर जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची भरीव देणगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

११ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सिन्नर भूषण, प्रज्ञाचक्षु त्र्यंबकबाबा भगत, ज्येष्ठ कीर्तनकार माधवबाबा घुले यांच्या हस्ते विश्वस्त संजय महाराज धोंडगे यांच्या कडे सुपूर्द करताना शेजारी अन्य मान्यवर.

स्थैर्य, फलटण दि. २३ : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे दि. २२ फेब्रुवारी ते दि. ४ मार्च २०२० दरम्यान संपन्न झालेल्या समारोपीय गाथा पारायण सोहळ्याचा जमा खर्च प्रमुख संयोजक युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी नुकताच सादर केला आणि शिल्लक राहिलेली सर्व म्हणजे ११ लाख ११ हजार १११ रुपयांची रक्कम श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर (नाशिक) च्या जीर्णोद्धारासाठी विश्वस्तांकडे सुपूर्त केली.

गाथा पारायण सोहळ्याचे प्रमुख संयोजक युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, सन २००८ सालापासून दरवर्षी एका ज्योतिर्लिंगावर गाथा पारायण सोहळा संपन्न झाला. फेब्रुवारी मध्ये समारोपीय गाथा पारायण सोहोळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पार पडला. मात्र त्यानंतर लगेचच कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरु झाल्याने जमाखर्च सादर करता आला नव्हता, तो आज सादर करण्यात आला. 

हॉटेल चालकांनी नियमांचे काटकोरपणे पालन करा : तानाजी बरडे

यावेळी सोहळ्यातील जमा व नावे बाजू वाचून दाखविण्यात आली. उरलेली सर्व रक्कम ११ लाख ११ हजार १११ रुपये सिन्नरभूषण, प्रज्ञाचक्षू त्र्यंबकबाबा भगत, ज्येष्ठ कीर्तनकार माधवबाबा घुले यांचे हस्ते मंदिराचे प्रमुख विश्वस्त संजय महाराज धोंडगे व इतर विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आली. मंदिराच्या कळसासाठी लागणारे सर्व सोने जमा करण्याची जबाबदारी ह.भ.प.बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी यावेळी घेतली आहे.

यावेळी निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त जयंत महाराज गोसावी, रामकृष्ण महाराज लहवितकर, माधवदास महाराज राठी, दीपक महाराज देशमुख, दत्ताकाका राऊत, प्रवीण वाघ, ज्ञानेश्वर आरोटे, सागर दौंड, व्यसनमुक्त युवक संघाचे राज्याध्यक्ष शहाजी काळे, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील पारायण सोहळ्याच्या काळात विविध प्रकारे मदत, श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

सातारच्या जान्हवी चा जगात डंका सिद्धासन आसनमध्ये 5 तासाचा केला नवा विश्वविक्रम


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!