हॉटेल चालकांनी नियमांचे काटकोरपणे पालन करा : तानाजी बरडे


 

स्थैर्य, फलटण, दि.२४ : फलटण शहरात व तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व हॉटेल मालकांनी व चालकांनी हॉटेल संदर्भातील व कोव्हीड १९ संदर्भातील सर्वच्या सर्व नियम काटेकोरपणे पालन करावे. जे हॉटेल चालक व मालक कोव्हीड १९ व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात नाहीत अशा सर्व हॉटेल चालकांवर व मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी दिला आहे.

काल उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या उपस्थित फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल व्यवसायिकांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण व फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इयत्ता ९ वी ते १२ वी शाळा सुरु मात्र विद्यार्थी उपस्थिती नगण्य

मीटिंग दरम्यान सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे त्या बाबत हॉटेल व्यावसायिकांना योग्य त्या सूचना या वेळी देण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होत असल्याने सर्व व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करणे गरजेचे असून सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग बाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हॉटेल चालकांनी नियमांचे काटकोरपणे पालन करा : तानाजी बरडे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!