
स्थैर्य, दि.१६: उत्तराखंडातील चमोली दुर्घटनेमध्ये बेपत्ता लोकांची शोध मोहीम सलग 10 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान उत्तराखंडचे DGP अशोक कुमार यांनी आपल्या 3-4 दिवसात अभियान बंद करण्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की ‘मला हे स्पष्ट करायचे आहे की जोशीमठ, रैणी आणि तपोवनातील बचावकार्य अभियान आणि स्थानिक लोकांना मदत करण्याची प्रक्रिया सतत सुरू असून 3-4 दिवसांत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले जाईल.
यापूर्वी सांगितले होते की लोकांची जिंवत राहण्याची आशा कमी
सोमवारी संध्याकाळी DGP यांनी सांगितले होते की बचावकार्य अभियान दिवस-रात्र चालू आहे. यामध्ये लोकांची जिंवत राहण्याची आशा कमी आहे. त्यामूळे हे रेस्क्यू ऑपरेशन 3-4 दिवसांच्या वर चालणार नाही. परंतू साफ-साफईचा काम सुरू असणार आहे.
आतापर्यंत आढळले 56 लोकांचे मृतदेह
SDRF च्या DG रिद्विमा अग्रवाल यांनी सांगितले आहे की आतापर्यंत 58 लोकांचे मृतदेह आढळले आहेत. त्यात 31 लोकांची ओळख पटली आहे. इतर मृतदेहांची ओळख ही DNA चाचणीद्धारे केली जात आहे. या बचावकार्यचा आढावा चमोलीच्या डीएम स्वाती भदौरिया यांनी घेतला आहे. सोबतच या कार्यातील अधिकाऱ्यांकडून प्रगती अवहाल प्राप्त केला आहे. आपत्तीमध्ये आतापर्यंत 148 लोक बेपत्ता आहेत.
SDRF ने रैणी गावात लावले अलार्म सिस्टीम
राज्य आपत्ती प्रतिसाद शक्तीने (SDRF) ने रैणी गावात अलार्म सिस्टीम लावले आहे. यामूळे ऋषिगंगा आणि धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढताच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देता येणार आहे. ज्यामुळे आजू-बाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सोपे जाईल.