
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । मुंबई । विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
विधिमंडळातील त्यांचा वावर हा मार्गदर्शक असा होता. त्यांची राजकीय आणि सामाजिक भूमिका ठाम होती. संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास असणारे, मृदुभाषी आणि अनेक विषयांची मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी असणारा नेता म्हणून दिवंगत रणपिसे यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



