क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. ३: थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिसिंह हा शब्दच ज्यांच्यासाठी असावा असे स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील होते. त्यांनी प्रतिसरकार स्थापून ब्रिटीश साम्राज्याला हादरा दिला. तरुणांमध्ये क्रांतीचे बीज पेरणारे नाना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे होते. आयुष्यभर ते मातृभुमीविषयी प्रेम आणि कष्टकऱ्यांबद्दल तळमळ घेऊन जगले. यासाठी त्यांनी प्रसंगी संघर्षही केला. अशा या थोर देशभक्त क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्रिवार अभिवादन.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!