जेष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्री होणार; राजभवन येथे शपथविधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 20 मे 2025 । मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ आज मुंबई येथील राजभवनात मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खाते रिक्त झाल्यानंतर भुजबळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. यापूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे ते नाराज होते, त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे.

छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये ह्या घडामोडीच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने ही घडामोड खूप महत्वाची आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळण्याच्या प्रतीक्षेतून त्यांची नाराजी दूर होणार आहे.

हे शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून, यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते उपस्थित राहतील.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्याने महाराष्ट्राच्या ओबीसी समुदायाच्या राजकीय प्रभावात वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!