लोकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रसायनमुक्त स्वदेशी भांडार उपयुक्त : ह.भ.प. बंडातात्या कर्‍हाडकर


स्थैर्य, फलटण : स्वदेशी चळवळ वाढविणार्‍या किंबहुना तरुणांमध्ये स्वदेशीविषयी जागृती करुन, त्यांच्यामध्ये स्वदेशीची भावना रुजवून स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या राष्ट्रबंधू राजीव दीक्षित यांच्या आदर्शावर लोकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रसायनमुक्त स्वदेशी भांडार उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे मार्गदर्शक, युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कर्‍हाडकर यांनी व्यक्त केला.

येथील राष्ट्रबंधू राजीव दीक्षित वस्तू भांडारच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच मधुकर वावरे, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील, वासुदेव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बंडातात्या म्हणाले, सद्य परिस्थितीत आहारात रसायनमुक्त पदार्थ असणे आवश्यक असून प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, रसायनमुक्त आहार व आदर्श आचार विचार जोपासणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती नाळे, साहेबराव सोनवलकर, उत्तमराव सोनवलकर, गजानन नाळे व विठ्ठल चांगण उपस्थित होते. भांडारच्या संचालिका सौ. संध्या संतोष भांड यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!