पावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा


स्थैर्य, फलटण : हा एक जड टिशू आहे जो पायाच्या तळाशी म्हणजे पायाच्या तळव्याशी उपस्थित असतो.  फॅसिया हा बाणाच्या दोरी सारखा दिसतो कारण तो टाचेच्या हाडांना पायांच्या बोटाशी जोडतो. प्लांटर फॅसाया वर येणाऱ्या सुजेला “प्लांटर फॅसायटीस” असे म्हणतात. ह्यामुळे जोरदार अक्षमता येऊ शकते.

चिन्हे व लक्षणे:-

•लीगामेंटवर सूज आल्याने.

•टाचांच्या वेदना

•पायाच्या तळव्यामध्ये वेदना.

•लालसरपणा, व टाचेच्या क्षेत्रात सुजेसोबत येऊ शकते.

•वेदना तीव्र किंवा सुस्त असू शकतात.

•सामान्यतः सकाळी पायांवर उभव राहिल्यानंतर वेदना जाणवतात.

अशा वेदनांमध्ये आणखीनही बिघाड होऊ शकतो जेव्हा पायाचा वापर शारीरिक क्रियेसाठी जसे की चालणे, धावणे, किंवा पायऱ्या चढणे यांसाठी केला जातो.

कारणे :-

•खेळामध्ये व्यस्त असताना टाचेच्या हाडांवर तान आल्याने.

•वजन जास्त असणे.

•जास्त वेळासाठी उभा राहिल्याने.

•दीर्घ काळासाठी हिल्स घातल्याने.

•पायांच्या कमान वर थोडासा आधार असलेले फुटवेअर घातल्याने.

•जास्त प्रमाणात धावल्यानेउडी मारताना होणारीदुखापात.

•हिल स्पर (हाडांची वाढ)

•थायरॉईड सारख्या आजारांनी हा रोग संभवतो.

निदान:-

डॉक्टर प्रथम त्या वेदनांची सुरुवात, तीव्रता, आणि अलीकडील काही क्रिया केली असेल आणि काही तक्रारी असतील तर त्यांची देखील दाखल घेतात.

निदानाची पुष्टी करण्यासाठी कुठल्याही अंतर्निहाय स्थितीचे कारण ओळखण्यासाठी इमेजिंग चाचणी जसे की एक्स रे केले जाऊ शकतो.

प्लांटर फॅसायटीस वर फिजियोथेरेपी चा उपचार:-

•पिंडरीचा स्नायू आणि तळव्याचा मिळून उपचार करावा लागतो.

•शॉकवेव्ज थेरेपी च्या सहाय्याने म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी अएर च्या सहायाने त्रास कमी करता येतो.

•इलेक्ट्रिक मोड्यालीटी नावाच्या अत्याधुनिक मशीन वेदना कमी करण्याची मशीन असे म्हंटले तरी चालेल चा वापर करून वेदना कमी करता येतात.

•आईस थेरेपी ही सुरुवातीच्या काळात एक महत्वपूर्ण कामगिरी बजावते जेणे करून वेदना कमी करता येतात.

•शरीराला तान देणारा शास्त्रीय व्यायाम खूप महत्वाचा आहे.

•पायाच्या वेदनांमध्ये चपलांन मधील बदल हा देखील खूप चं ठरू शकतो.

•नाईट स्प्लिट हा एक उपाय आहे ज्याने वेदना कमी करता येतात.

•काही काळानंतर डॉक्टर शास्त्रीय व्यायामाने कसे ठीक होता येईल हे सांगतात.

पावलांची ठेवण किंवा चप्पल मधील बदल करणे महत्वपूर्ण उपाय-

अनेक लोकांना गैरसमज असतो की चप्पल मधील बदल करून टाच दुखी, गुढगे दुखी टाळता येत नाही. खरं तर लहान पणापासून जर योग्य अशी चप्पल आपण वापरली तर आयुष्यभरासाठी आपण आपल्या गुडघ्यांना आणि टाचेला वेदना मुक्त करू शकतो. तेव्हा आपण या बद्दल अधिक माहिती पुढे पाहूयात.

उंच टाच असणारी चप्पल घालणे-

आजकाल आपली स्वतःची उंची जास्त दिसावी म्हणून तसेच फॅशन म्हणून उंच टाच असणारी चप्पल घालणे लोक पसंत करतात. पण अशा उंच टाच असणाऱ्या चप्पल अथवा शूज घालणे टाच दुखी आणि मणक्यांच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. तेव्हा वेळीच यांना आवर घातली तर तुमची भविष्यात होणाऱ्या या वेदनेपासून स्वतःचे रक्षण करू शकता. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन चप्पल मध्ये बदल केला असता याचा फायदा होऊ शकतो.

मुलांना चांगली सवय- लहान मुलांना लहानपणा पासून योग्य अशी चप्पल वापरण्यास दिली तर मुलांना मणक्याचे आणि गुडघ्यांचे त्रास  होण्याचे प्रमाण खूप कमी होते.

आम्ही डॉ. अकोलकर यांच्या अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये तुम्हाला आमच्या कडील कौशल्याचा  आणि मशिनरीज चा  वापर करून शस्त्रक्रिया मुक्त अशी उपचार पद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनान पासून मुक्त करतो.

डॉक्टरांची वैशिष्टे-

•डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. 

•जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया  मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ  डॉक्टर आहेत. 

•डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.

• अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय  व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.

•जर्मनी टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक अश्या  उपकरणांचा उपयोग करून  मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.

संपर्कासाठी पत्ता-

1.डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत.

2.साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (S.T. Stand च्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.

3.संघवी क्लासिक अ. फ्ल्याट नं. 1  सम्यक लाईफस्टाईल पाठीमागे, भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत.

मोबाईल नंबर-7350069955


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!