Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.

केंद्र म्हणाले – ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन म्यूटेशनची देशात कोणतीही केस नाही, याचा व्हॅक्सीनवरही परिणाम होणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२३: ब्रिटनमध्ये आढळलेल्या
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र
भारतात या कोरोनाच्या नवीन स्ट्रोनचे एकही केस नाही, असे केंद्र सरकारने
मंगळवारी सांगितले. कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगाने पसरतो. या म्यूटेशनचा
केसेसच्या तीव्रतेवर आणि मृत्यूवर परिणाम होणार नाही, असे नीति आयोगाचे डॉ.
व्हीके पॉल यांनी सांगितले.

देशात
बनत असलेले व्हॅक्सीनबाबत त्यांनी म्हटले की, आतापर्यंत आपल्या देशाने इतर
देशांमध्ये बनत असलेल्या लसीच्या क्षमतेवर याचा काहीच परिणाम होणार नाही.
ते म्हणाले की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत काळजी करण्याचे कारण नाही.
यामुळे घाबरण्याचेही काही कारण नाही. आत्ता आपण सावध असणे आवश्यक आहे.

देशात आता 3% पेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण

आरोग्य
मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सुमारे साडे 5
महिन्यानंतर देशात 3 लाखांपेक्षा अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्या देशात एकूण
प्रकरणांपैकी केवळ 3% अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मागील 7 आठवड्यांपासून दररोज
आढळणाऱ्या कोरोनाच्या सरासरी रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशातील 26 राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 हजारांपेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण
असल्याचे त्यांनी सांगितले.

रिकव्हरी रेट 95% पेक्षा जास्त

देशाचा
कोरोनामुक्तीचा दर 95% पेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 75 हजार
422 प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील 96.35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले
आहेत. आणि 1.46 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2.90 लाख
रुग्णांवर उपचार सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!