
स्थैर्य, सातारा, दि. २३: कोरोना कालखंडात जोखीम पत्कारून काम करणार्या सफाई कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने परिपत्रक काढले होते. परंतु, सातारा पा लिकेने परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून 7 महिन्याच्या सेवेचे चीज करण्याऐवजी एक हजार रुपये अदा करून क्रुर चेष्टा केली असल्याचा आरोप करत अखिल महाराष्ट्र क ामगार कर्मचारी संघाने पालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने के ली. यावेळी पालिकेने कर्मचार्यांना 7 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यामध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना सर्व नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी जीवाची क सलीही पर्वा न करता प्रामाणिकपणे काम केले आहे. याचा विचार करून महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन प रिपत्रक काढून नियमित वेतन मानधना व्यतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता देण्यास सांगितले होते. परंतु, जोखीम पत्करून काम क रणार्या या सेवकांना प्रोत्साहन म्हणून फक्त 1000 रुपये अदा केले आहेत. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अन्वयार्थ काढून कर्मचार्याची मोठी क्रूर चेष्टा व क्रूर अवहेलनाच केली असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र क र्मचारी संघाने करत सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, शासनाच्या परिपत्रकानुसार कमीत कमी लॉकडाऊन कालखंडातील 7 ते 8 महिन्याचा कालखंड विचारात होता. त्यामुळे कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याच्या वेतनाबरोबर1 हजार प्रमाणे कमीत कमी 7हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तातडीने थकित प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा व कर्मचार्याच्या कामाचे चीज करण्यात यावे, अन्यथा अखिल महाराष्ट्र क ामगार कर्मचारी संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्रकात दिला आहे.