राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ आज दि. ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि, दि. ५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मा. मोदीजींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.

ते म्हणाले की, मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!