रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठा दिलासा; सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत मिळणार कॅशलेस उपचार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

देशातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांची ‘पीएम-राहत’ योजनेत तातडीने नोंदणी करून अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्याचे निर्देश एनएमसीने दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : रस्ते अपघातातील जखमींना अपघातानंतरच्या पहिल्या तासात अर्थात ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने आणि आर्थिक अडचणींशिवाय उपचार मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांचा ‘प्रधानमंत्री रस्ते अपघातग्रस्त रुग्णालयीन व हमी उपचार योजनेत’ (पीएम-राहत) समावेश करण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) दिले आहेत. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होणार आहे.

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या नोंदणीला प्राधान्य

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ट्रॉमा अँड बर्न कक्षाने पाठवलेल्या पत्राच्या आधारे एनएमसीने देशातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य आणि वैद्यकीय अधीक्षकांना यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या सर्व संस्थांची नोंदणी प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहे.

देशभरात २५ हजार रुग्णांचा जीव वाचवला

केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी रोजी देशभरात ‘पीएम-राहत’ योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत सप्टेंबरअखेरपर्यंत देशभरातील सुमारे २५ हजार रस्ते अपघातग्रस्तांवर कॅशलेस उपचार करण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३५० रुग्णांचा समावेश आहे. तसेच १३ हजार प्रकरणांमध्ये रुग्णालयांना उपचाराचा खर्च परत करण्यात आला आहे. या योजनेची व्याप्ती अधिक वाढवून अधिकाधिक रुग्णांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी वैद्यकीय महाविद्यालयेही या कक्षेत आणण्यात आली आहेत.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!