
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा : गोडोली, सातारा येथील पानशॉप फोडून चोरट्याने 3800 रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पानशॉपे मालक सचिन नामदेव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. गोडोली येथील साईबाबा मंदिरालगत त्यांचे लक्ष्मी पानशॉपी अँड जनरल स्टोअर्स आहे. दि. 23 मार्च ते 16 ऑगस्टदरम्यान त्यांच्या टपरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख 3 हजार 800 रुपये चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार जाधव तपास करत आहेत.
