दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२३ | फलटण |
मिरगाव (तालुका फलटण) गावचे हद्दीत शुक्रवारी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार अपघातात तिघीजण जखमी झाल्या आहेत. याबाबतची फिर्याद सुनील निंबाळकर (रा. लक्ष्मीनगर, बारोबार, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
स्वाती सुनील निंबाळकर, कोमल सुनील निंबाळकर व हेमलता भरत अभंग अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या अपघाताची पोलिसांकडून अधिक माहिती अशी, मिरगाव (तालुका फलटण) गावचे हद्दीत शुक्रवारी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास नमो तर्केश वेळेवर ठिकाणी मेरे गाव, तालुका फलटण गावच्या हद्दीत सातारा ते फलटण जाणार्या रस्त्याने जात असताना मिरगाव गावचे हद्दीत मंदिराजवळ आलो असता आमचे वाहन रस्त्यावरील स्पीडब्रेकर ओलांडून पुढे जाताना पाठीमागून एक भरधाव वेगात पांढर्या रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक एम एच ०२ डीजे ३८ ९९) या गाडीवरील चालक भरत दत्तात्रय अभंग याने आपल्या ताब्यातील वाहन भरभाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून आमच्या महिंद्रा कंपनीच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक देऊन पुढे असलेल्या मंदिरालाही जाऊन धडक दिली. या अपघातात स्वाती सुनील निंबाळकर, कोमल सुनील निंबाळकर व हेमलता भरत अभंग या जखमी झाल्या असून मंदिराचेही नुकसान झाले आहे, अशी फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भरत दत्तात्रय अभंग (राहणार विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.