दिवाळीत घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा खुसखुशीत बटर चकली; जाणून घ्या सोपी रेसिपी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या फराळात भाजणीच्या कटकटीशिवाय घरच्या घरी कमी वेळेत खमंग आणि कुरकुरीत बटर चकली तयार करण्याची सोपी पद्धत समोर आली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. ०४ नोव्हेंबर : दिवाळीच्या सणात फराळाला विशेष महत्त्व असून कुरकुरीत चकलीशिवाय फराळाची ताटली अपूर्ण मानली जाते. मात्र, पारंपरिक पद्धतीने चकलीसाठी भाजणी तयार करणे अनेकांसाठी किचकट ठरते. यावर सोपा पर्याय म्हणून यंदाच्या दिवाळीत भाजणीची कोणतीही झंझट न ठेवता झटपट आणि खुसखुशीत बटर चकली घरच्या घरी तयार करता येणार आहे.

साहित्य आणि कृतीची सोपी पद्धत

ही चकली बनवण्यासाठी चणा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन मऊ होईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर एका ताटात तांदळाचे पीठ, पांढरे तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग, धणे-जिरे पावडर, बटर आणि चवीनुसार मीठ एकत्र करून त्यात शिजवलेली डाळ व कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावे. चकलीच्या साच्यात हे पीठ घालून कढईत मंद आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यास स्वादिष्ट बटर चकली तयार होते.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!