काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री बूटा सिंग यांचे प्रदीर्घ आजाराने निधन


स्थैर्य, दि.२: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री बूटा सिंग यांचे शनिवारी निधन झाले. 86 वर्षी बूटा सिंग प्रदीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

बूटा सिंग एक अनुभवी प्रशासक होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

देशाने सच्चा आणि निष्ठावान नेता गमावला अशी भावना राहुल गांधींनी व्यक्त केली.

पंजाबच्या जालंधर येथे जन्मलेले बूटा सिंग एक दलित नेते म्हणून ओळखले जात होते. अकाली दलमध्ये राहून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली नंतर 1960 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1962 मध्ये त्यांनी लोकसभेत पहिला विजय मिळवला होता. तब्बल 8 वेळा ते खासदार होते. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषीमंत्री आणि त्यानंतर गृहमंत्री पद भूषविले. 2004 ते 2006 पर्यंत ते बिहारचे राज्यपाल होते. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्ष पदावर सुद्धा काम केले आहे.


Back to top button
Don`t copy text!