तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटांमध्ये श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संघनायक आदित्य चव्हाण व त्यांच्या संपूर्ण टीमने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

क्रीडाविभाग प्रमुख निंबाळकर, क्रीडाशिक्षक सूळ, प्रशिक्षक बिचुकले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन नितीनशेठ गांधी व सर्व सदस्य तसेच सोसायटीचे प्रशासनाधिकारी निकम सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक शेडगे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, दालवडी पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ यांनी विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!