
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
नारायण राणे यांनी मीडियासमोर बोलताना विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे खोटे वय सांगून आपली स्वार्थी वृत्ती सबंध महाराष्ट्रापुढे दाखवली आहे. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमचे नेतृत्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आमच्यासाठी ‘हिरो’ आहेत आणि त्यांचे वय सध्याच्या घडीला ७६ इतके आहे, असे प्रतिपादन फलटण येथील श्रीमंत रामराजेंचे कट्टर समर्थक किरण निंबाळकर यांनी केले आहे.
हितून पुढे आमच्या नेत्यावर विचार करून बोलावे अन्यथा आम्ही ते कदापि सहन करणार नाही, असा इशाराही किरण निंबाळकर यांनी दिला आहे.
