हिंदकेसरी पहिलवान मारुती माने यांच्यावर पुस्तक आणि चित्रपट


 

स्थैर्य, दि. ११ : मराठमोळ्या कुस्तीची पताका जगभर फडकवणारे हिंद केसरी मारुती माने हे नव्या पिढीपेक्षा मागील दोन पिढ्यांना आपल्या कुस्तीतील करामतीने सर्वश्रुत आहेत. पहिलवान म्हणून आपली कारकीर्द गाजवताना या लाल मातीतल्या  ढाण्या वाघाचा पराक्रम आजच्या पिढीच्या समोर आणायच्या हेतूने कॅनडा स्थायी असलेले सुनिल मंत्री ह्यांनी दोन वर्षां पेक्षा जास्त काळ पहिलवान मारुती माने (भाऊं)ची माहिती गोळा केली. माने यांच्या कुटुंब, त्यांचा परिवार,  मित्र मंडळी, गाव, सहकारी, प्रेक्षक ह्यांना प्रत्यक्ष भेटुंन भाऊंच्या कुस्तीच्या बद्दल माहिती घेतली. सांगली , सातारा, कोल्हापूर, बेळगांव, सोलापूर, पुणे, मुंबई, दिल्ली आणि इतर ठिकाणी भेट घेऊन सर्व माहिती गोळा केली आहे . ही माहिती आता पुस्तक रूपात प्रकाशित करणार आहेत. करोनाच्या मुळे सध्या प्रकाशन काही दिवसांनी केले जाणार आहे.

येत्या 15 ऑगस्ट चे औचित्य साधून पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकासोबत  माने यांच्या आयुषावरील मराठी चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर काम सुरु असून चित्रपटात मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक ज्येष्ठ ,वरिष्ठ कलाकार त्यात काम करणार आहेत अशी माहिती सुनील मंत्री यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!