दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
शरयू साखर कारखान्याकडून चालू वर्षी प्रती टनाप्रमाणे साखर वाटप चालू करण्याचा निर्णय घेतला असून ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांची दिवाळी गोड केली आहें.
फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याचा ९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रारंभी संचालक श्री. अविनाश भापकर यांनी सपत्नीक होमहवन व नवग्रह पूजा केली. चालू वर्षीच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक तोडणी यंत्रणेचे करार करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात मंत्री समितीची बैठक होणार असून गळीत हंगाम तारीख जाहीर होताच गळीत हंगाम चालू करण्यात येणार आहे.
शरयूने याहीवर्षी तालुक्यात उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली असून शंभर टक्के एफआरपीपेक्षा अधिक रक्कम ऊस पुरवठादार शेकर्यांना अदा केली आहे.
चालू वर्षी उसाचे क्षेत्र अडचणीत असून फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, खंडाळा, भोर, माळशिरस, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी आपला ऊस शरयूला घालावा, असे आवाहन श्री. युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे.