स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार हजार शिक्षकांची बोगस भरती; शिक्षक नेता शिरसाठ मुख्य सूत्रधार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 23, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि २३: राज्यात २०११ नंतर शिक्षक भरतीवर बंदी असतानाही शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिक्षक नेता असलेला मुख्याध्यापक संभाजी शिरसाठ याच्या बँक खात्यावर मागील तीन ते चार वर्षांत दाेन ते तीन काेटींचे बँक व्यवहार झाल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शिरसाठ याच्यासह एकूण २८ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिरसाठ हाच शिक्षक भरती घाेटाळ्यात मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पाेलिसांना असून त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी याबाबतचा अर्ज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिला आहे. एसीबीची मंजुरी मिळताच, शिरसाठ याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हाेणार असल्याचे संकेत वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संभाजी शिरसाठ हा मुख्याध्यापक असताना त्याच्या बँक खात्यावर काेट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांत २० ते २५ लाख रुपये असल्याचे आढळले आहे. पाेलिसांनी त्याच्या मालमत्तेवरच टाच आणण्याच्या दिशेने कारवाई सुरू केली आहे. पाेलिसांनी शिरसाठच्या माेशी प्राधिकरण येथील तीन कार्यालये, चिखली, आळंदी, काळेवाडी आणि बंडगार्डन शाळेचे कार्यालय व संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या वेळी माेठ्या संख्येने बनावट शिक्के आणि शिक्षक भरती घाेटाळ्याचे दस्तऐवज पोलिसांना सापडले आहेत. शिक्षक भरतीस २०१२ पासून बंदी असताना, शिरसाठ याच्या पुढाकाराने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून २०१२ पूर्वीच्या तारखांची नियुक्तिपत्रे देत अनुदानित पदांवर शिक्षकांची विविध शाळांत भरती केली. याकरिता प्रत्येक शिक्षकाकडून १० ते १२ लाख रुपये घेण्यात आल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणात पुण्यातील समर्थ पाेलिस ठाणे आणि बंडगार्डन पाेलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असलेल्या शिरसाठ याने शिपाई व लिपिक यांच्या बनावट मान्यता तयार करून, त्या खऱ्या असल्याचे भासवून जून ते सप्टेंबर २०१६ दरम्यान वेतन देयके वेतन पथक (प्राथमिक) यांच्याकडे सादर केली. वेतनापाेटी शासनाची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रारही पाेलिसांत करण्यात आली आहे.

अटकपूर्व जामीन फेटाळला
शिक्षकांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाठ, सरकारी अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षक अशा एकूण २८ जणांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी फेटाळला. तत्कालीन शिक्षण मंडळाचे शिक्षणप्रमुख रामचंद्र जाधव, तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर, पिंपरी-चिंचवड मनपाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योस्त्ना शिंदे आणि गोविंदराव दाभाडे यांच्यासह २८ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

बोगस भरती, तपास सुरू
शिक्षक भरती घाेटाळा प्रकरणात संभाजी शिरसाठ याची भूमिका प्रमुख असल्याचे तपासात समाेर आले आहे. अनेक शिक्षकांची अनुदानित पदावर लाखाे रुपये घेऊन बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात चार हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची भरती प्रक्रियाची चाैकशी सुरू आहे. ही संख्या वाढू शकते. काेट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला असल्याने सखाेल तपास सुरू आहे. -डाॅ.शिवाजी पवार, सहायक पाेलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

ऑक्टोबर २०१९ मध्ये फिर्याद
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि त्यांची टीमने या प्रकरणाचा तपास करून बोगस शिक्षक भरती गैरव्यवहार आणि सरकारी तिजोरीची लूट समोर आणली. याप्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या आदेशान्वये पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन दत्तोबा भुजबळ यांनी बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय दंड संहितेतील फसवणूक, कट रचणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

आता सरपंच पदाची लाॅटरी कोणाला.. सर्वांच्या नजरा सरपंचपद आरक्षण सोडतीकडे

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी स्वाभिमानावरुन शिवसेनेला डिवचले

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी स्वाभिमानावरुन शिवसेनेला डिवचले

ताज्या बातम्या

केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021

एंजल ब्रोकिंगच्या चीफ ग्रोथ ऑफिसरपदी प्रभाकर तिवारी यांची नियुक्ती

March 4, 2021

महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

March 4, 2021

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती

March 4, 2021

सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून अजितदादांच्या महसूल, वित्त विभागाला सूचना

March 4, 2021

जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनीजारी केले पून्हा सुधारित आदेश

March 4, 2021

मंत्री अस्लम शेख आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.