लोणंदमध्ये खून केलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | फलटण |
लोणंद (ता. फलटण) मधील लोणंद रेल्वेस्टेशन गार्डनमध्ये सिमेंटच्या बाकाजवळ आरोपीने सिमेंट काँक्रिटचा मोठा तुकडा घालून खून केलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याची फिर्याद विजय किशोर गार्डे (वय ३३, रा. रेल्वे कॉलनी, लोणंद, मूळ रा. सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातार) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.

हा मृतदेह पुरूष जातीचा, अंदाजे वय ३० ते ३५, अंगावर पांढरे रंगाचा फुल भायाचा शर्ट, राखडी रंगाची फुल पॅन्ट, निळे माचो कंपनीची अंडरवेअर, उजवे हातात दोन पांढरे धातूची कडी, गळयात पांढरे धातूची साखळी चेन, उजवे हातावर त्रिशुलाचा टॅटु असलेला, त्याचेजवळ ठाणे ते लोणंद व लोणंद ते कोल्हापूर अशी दिनांक १४/७/२०२४ रोजीची रेल्वे तिकीटे, त्याचे खिशात ७ साध्या बिडया, पांढरे रंगाची फनी कंगवा, प्लास्टीकची निळे रंगाची त्यास तांबड्या बंदाची चप्पल असलेली, चप्पलवर आयपीएल ट्रेडमार्क असलेली, काळपट राखडी रंगाची लाल बंद असलेली कापडी पिशवी त्यात चॉकलेटी, तांबूस हिरवे रंगाचे ब्लॅकेट, मयताचे ठिकाणी लाल पटटा असलेले मनगटी घड्याळ असे वर्णनाचा आहे.

या प्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास लोणंद पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!