दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण, जायंटस ग्रुप फलटण व फलटण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.चे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शनिवार, दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सजग युवकांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास मे गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री. विश्वासराव देशमुख, व्हाईस चेअरमन श्री. रमनलाल दोशी, श्री. हेमंत रानडे, श्री. शिरीष दोशी, श्री. रणजित निंबाळकर, डॉ. श्री. पार्श्वनाथ राजवैद्य, श्री. शरदराव रणवरे, श्री. शिरीष भोसले, सौ. नूतन शिंदे, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण तसेच जायंटस ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्री. शांताराम आवटे, श्री. प्रभाकर भोसले सेक्रेटरी, श्री. प्रदीप फडे खजिनदार, श्री. मोहनराव बापू नाईक निंबाळकर, श्री शिरीष शहा, श्री.दिपक दोशी, श्री. धनाजीराव जाधव, श्री. हणमंतराव घनवट,प्राचार्य श्री बाबासाहेब गंगावणे, श्री. शंभुराज नाईक निंबाळकर प्राचार्य कोळेकर सर, प्राचार्य जालिंदर माने, प्राचार्य डॉ इंगवले सर, ब्लडबँक फलटणचे डॉ करवा व डॉ ऋषिकेश राजवैद्य व सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी अशा एकूण १०१ बॅग्स रक्तदान करण्यात आले. रक्तदान केलेल्या सर्वांना आयोजकांतर्फे सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे व प्रा. महेश बिचुकले, स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.