क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा


स्थैर्य, दि.२४: सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. यानंतर बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एनसीबी टीमचे सुरु असलेले तापसकार्य आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे ऑफिसर समीर वानखेडे करत आहेत. दरम्यान समीर वानखेडेआणि त्यांच्या टीमवर काल गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. यानंतर समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरने सोशल मीडियावर समीर ठिक असल्याचे सांगितले आहे. ड्रग्ज पेडलर्सनी केलेल्या हल्ल्यात ३ एनसीबी अधिकारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान राडा; नऊ जणांना अटक

सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणानंतर एनसीबीची टीम ड्रग्ज कनेक्शनच्या शोधात आहे. त्यामुळे ड्रग्ज पेडलर्सचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात समीर वानखेडे आणि त्यांचे दोन अधिकारी जखमी झाले होते.अभिनेत्री क्रांती रेडकरने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करुन समीर यांच्या तब्येतीची माहिती दिली. तिने लिहिले की, समीर हे ठिक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत घरी आहोत. नार्कोटीक्सच्या टीमला मोठा सॅल्यूट जे ड्रग्ज कनेक्शनच्या विरोधात उभे राहिले आहेत. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. २९ मार्च २०१७ मध्ये क्रांती व समीर यांनी लग्नगाठ बांधली आणि आता त्यांना जुळ्या मुली आहेत.

जॉइंट डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मासह बॉलिवूडच्या अनेकांच्या घरी छापेमारी केली आहे.२०१३ मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती. समीर २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखील दोन वर्षात सुमारे १७ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. नुकतेच समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाची 24 तासांत अंमलबजावणी; नेर तलावातून रब्बीसाठी सोडले पाणी

क्रांतीने मराठीसोबतच ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात तिने अपूर्वा कुमारीची भूमिका निभावली होती. जत्रा सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आॅन ड्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या सिनेमात काम केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!