येळकोट येळकोट जय मल्हार..! प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार


 

स्थैर्य, दि.२४: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आली होती. आई माझी काळूबाई या मालिकेला तिने अचानक निरोप घेतला. तिने अचानक मालिका का सोडली, याबाबत चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर ती आणि या मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालेल्या वादामुळे पुन्हा ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेला ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच प्राजक्ताने जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतले आहे आणि त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्राजक्ता गायकवाड हिने नुकतेच जेजुरी येथे जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले आहे. यावेळचे तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

आनेवाडी टोलनाक्‍यावर अधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

या फोटोत तिने खंडा तलवार उचलल्याचे दिसून येते आहे. खंडेरायाचा ४२ किलो वजनाची खंडा तलवार साऱ्यांनाच ठावूक आहे. हीच खंडा तलवार प्राजक्ताने उचलली असून सोबत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. सध्या तिच्या या फोटोची खूप चर्चा होत असून या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेत तिने येसूबाईंचे पात्र साकारले होते. या मालिकेसाठी प्राजक्ताने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.

याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम मालिकेत काम केले आहे.

प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंग सरनाईकांना ईडीने घेतले ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला रवाना


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!