स्थैर्य, वहागाव (जि. सातारा), दि.२४ : युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या कारणावरून वनवासमाची येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. त्यात पोलिसांत दोन्ही गटावर परस्परविरोधी फिर्यादी आल्याने 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास घटना घडली. दिवसभर गावात त्याचे पडसाद उमटल्याने तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत गावात पोलिस बंदोबस्त होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनवासमाची येथे दोन गटांत मारामारी झाली. त्याबाबत फिरोज भालदार व दादासाहेब निंबाळकर यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. फिरोजची पुतणी पळून गेली आहे. तिला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून फिरोजने दादासाहेब निंबाळकर यांच्याशी वाद घातला. त्यात दादासाहेब यांच्यासह प्रकाश पाटील, पूजा निंबाळकर, किसा निंबाळकर यांनी मदत केल्याचा संशय व्यक्त केल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. संबंधितांनी फिरोज व सज्जाद भालदार यांना लाथाबुक्यांनी, दांडक्याने मारहाण केली. त्यानुसार चौघांवर गुन्हा नोंद आहे. दुसरी फिर्याद दादासाहेब निंबाळकर यांनी दिली आहे. त्यात 13 जणांविरोधात गुन्हा आहे.
श्री. राजन सिताराम कदम यांचे निधन
त्यात म्हटले आहे, की अक्षय पाटणेने पुतणीस पळवून नेले आहे, असा आरोप करत फिरोज भालदार व त्याच्या दहा ते बारा सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली. मारहाणीत दादासाहेब यांच्यासह त्यांची पत्नी पूजा, मेहुणे प्रकाश पाटील जखमी आहे. फारूक भालदार, फिरोज भालदार, सज्जाद भालदार, रियाज भालदार, शौकत भालदार, सोहेल भालदार, रफिक भालदार व इतर चोघांनी मारहाण केल्याचे दादासाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये दोन्ही गटांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल आहे. 17 पैकी दोन्ही गटांतील 9 जणांना अटक केली आहे.
वीज बिल माफ करा, अन्यथा आसुडाचे फटके; बळीराजाचा सरकारवर ‘प्रहार’