
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, सातारा, दि.२६: सैदापूर, ता. सातारा येथील एका घराच्या बांधकामाच्या आणलेले 20 हजारांचे लोखंडी बार चोरून नेल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, सिद्धार्थ विजय शिंदे रा. मल्हारपेठ, सातारा यांच्या घराचे बांधकाम सैदापुरातील साई दर्शन कॉलनीत सुरू आहे. याठिकाणी बांधकामासाठी आणून ठेवलेले 20 हजारांचे लोखंडी बार संतोष बबन घाडगे, भोपाळ किसन घाडगे दोघे रा. गोसावी वस्ती, सैदापूर यांनी चोरून नेले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार जाधव तपास करत आहेत.





