स्थैर्य, सातारा, दि.२३: कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांचे दिल्ली राजधानीच्या सीमेवर गेली 26 दिवस आंदोलन होत आहे. कडाक्याच्या थंडीतही श्रमजीवी शेतकरी पोशिंदा आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांवर ठाम असणार्या शेतकर्यांचा लढा सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत मृत्युमुखी झालेल्या शेतकर्यांना शहीद व्हावे लागले ही बाब मानवतेच्या दृष्टीने काळीमा फासणारी व निंदनीय आहे. ऐतिहासिक सातारा याठिकाणी शेतकर्याच्या बद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आसूड निदर्शने आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी वैराट म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी उग्र आंदोलन उभे राहावे. जेणेकरून शेतकर्यावर जुलमी दंडात्मक कारवाई होत आहे आणि भांडवलशाहीच्या हिताचा कायदा असल्यामुळे पोशिंदा वर अन्याय होत आहे. त्याविरोधात आम्ही शेतकरी अवजारे आणि शेतकर्यांच्या वेशभूषेत आंदोलन उभारून इशारा देत आहोत. तात्काळ शेतीविषयक केलेले कायदे रद्द करून शेतकर्यांच्या हिताचे कायदे करावे, ही मागणी महाराष्ट्रातील गोरगरीब झोपडपट्टीवासीय मागणी करीत आहे.
तसेच कोरोनाच्या महामारीमुळे देशावरील आलेली मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना सेवेत घेऊन सक्तीने कपात केल्यामुळे कुटुंबाची हलाखीचे दिवस आणि उपासमार झालेली असल्यामुळे आता हळूहळू कोरोना हद्दपार होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गमावलेल्या नोकरांना पूर्वीच्या अस्थापनावर सेवेत घेऊन पूर्ववत कायम करावे अशीदेखील मागणी वैराट यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, बिलोली येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना शक्ती कायद्यानुसार फाशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात विशेषता काबाड कष्ट करणारे शेतकरी मजूर अंग मेहनती कार्यकर्ते हे शेतकरी वेशभूषेत वेशभूषेत एकत्र जमून शेतकर्यांचे अवजार घेऊन पवई चौकात निदर्शने करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, अशोक खुडे, प्रवीण सपकाळ, सनी ननावरे, सचिन वायदंडे, सागर पवार, अशोक जाधव, ऋषिकेश वायदंडे, सुनिता जाधव, महंमद शेख, सुरेखा भालेराव, निवृत्ती वैराट इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. शेकडो कार्यकर्ते आंदोलनात निदर्शने करताना शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहिजे, गमावलेल्या नोकर्या परत द्या, नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावी अन्याय अत्याचार करणार्या गुन्हेगारांना नवा शक्ती कायदानुसार फाशी द्या अशा घोषणा दिल्या.