नेव्हीने दाखवली तयारी : अँटी शिप मिसाइलने टारगेट उडवण्याचा व्हिडिओ जारी, अरबी समुद्रातील जुन्या जहाजाला बनवले लक्ष्य

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, दि.२३: भारतीय नौदलाने युद्धाची तयारी दाखवण्यासाठी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, युद्ध नौकेतून सोडलेल्या अँटी शिप मिसाइलने एका जहाजावर अचुक वार केला. ही ड्रील अरबी समुद्रात करण्यात आली.

नौदलाच्या आयएनएस प्रबल या युद्ध नौकेतून अँटी शिप मिसाइल डागण्यात आले. आयएनएस प्रबल नौसेनेच्या युद्ध अभ्यासातील जहाज आहे. या अभ्यासात एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यसोबत अनेक युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि विमानं भाग घेत आहेत. नौसेनेच्या प्रवक्त्याने ट्वीट करुन सांगितले की, आयएनएस प्रबलमधून लॉन्च झालेल्या मिसाइलने आपल्या मॅक्सिमम रेंजने एका जुन्या जहाजाली टार्गेट केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!