फलटण पालिकेविरोधात मंगळवारी भाजपचा निषेध मोर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण शहरातील पाणीपुरवठा, सावर्जनिक स्वच्छतागृहे, भुयारी गटार योजना, रस्ते व्यवस्थापन, झाडेझुडप यांची वाढ, डास प्रादुर्भाव, साथीच्या रोगांचा फैलाव अशा अनेक बाबींचा निषेध नोंदवण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली फलटण नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात मंगळवार, दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे, भाजपचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले.

शहरातील गजानन चौक, श्रीराम मंदिर, शिंपी गल्ली, रविवार पेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ या मार्गे सदर मोर्चा फलटण नगरपालिकेच्या कार्यालयावर धडकणार असल्याचे अमोल सस्ते यांनी सांगीतले.

Back to top button
Don`t copy text!