भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. लक्ष्मण जगताप यांना अर्पण केली श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । मुंबई । आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा जनाधार वाढविणारा आणि शहराच्या विकासासाठी सदैव झटणारा लोकप्रतिनिधी गमावला, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने गेल्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बहुमत मिळविले. यामध्ये आ. लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान होते. त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा जनाधार वाढविण्यासाठी काम केले. त्यांना पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा ध्यास होता. शहराच्या प्रश्नांची जाणीव होती व ते सोडविण्यासाठी त्यांनी अथक परीश्रम केले.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आजारी असूनही ते जिद्दीने मतदानाला उपस्थित राहिले आणि त्यांचे मत पक्षासाठी मौल्यवान ठरले. पक्षासाठीची त्यांची बांधिलकी कधीही विसरता येणार नाही. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!