वीर धरणातून विसर्गात मोठी वाढ, नीरा नदी पुन्हा धोक्याच्या पातळीकडे; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भाटघर धरणातून विसर्ग घटवला, तर नीरा देवघरमधून पाणी सोडणे बंदच; केवळ वीरमुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : नीरा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने नव्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नीरा उजवा कालवा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, केवळ वीर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवल्याने नदीतील एकूण प्रवाह जवळपास ३०,००० क्युसेक्सवर पोहोचला आहे.

मंगळवारच्या अहवालानुसार, वीर धरणातून तब्बल २२,९६५ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दुसरीकडे, भाटघर धरणातून होणारा विसर्ग कमी करून ६,३०० क्युसेक्स करण्यात आला आहे, तर नीरा देवघर धरणातून पाणी सोडणे अद्यापही पूर्णपणे थांबवलेले आहे. गुंजवणी धरणातून ७३३ क्युसेक्स विसर्ग कायम आहे. केवळ वीर धरणातील वाढीव विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

सध्या नीरा प्रणालीतील सर्व धरणांमध्ये मिळून ९८.२३% इतका पाणीसाठा आहे. यामध्ये भाटघर आणि वीर ही धरणे १००% क्षमतेने भरलेली आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, फलटण तालुक्यातील शेतीसाठी नीरा उजवा कालव्यातून १,४६६ क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे सिंचनाचा पाणीपुरवठा सुरळीत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!