भुईंजच्या ग्रामपंचायत सदस्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । भुईंज। येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे यांनी जिल्हा बँकचे अध्यक्ष व किसन वीर कारखान्याचे संचालक नितीनकाका पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
वाई -खंडाळा – महाबळेश्वर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते जनमत पाहुन सामान्य जनतेच्या कामांचा निपटारा तातडीने कोणाकडे गेल्यावर होतो तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडूनच, याचा प्रत्यय बहुतांश लोकांना येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे लोकप्रिय जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे राहुल कांबळे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगडे, युवा नेते सुधीर पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक सुजितसिंह जाधवराव, भुईंज ग्रामपंचायत सदस्य नारायण नलवडे, नंदकुमार खरे, प्रकाश पावशे, निलेश भोसले, वैभव शिंदे, पोपट शेवते, किरण कांबळे, लाला कांबळे, मिलिंद खरात, गिरीश कडाळे, विजय भोसले, भरत भोसले, बाळासाहेब जाधवराव, दत्तात्रय भोसले-पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!