भुईंजच्या दिनबंधुने दिले रक्तदान चळवळीत योगदान


स्थैर्य,भुईंज,दि.२: सद्यस्थितीत रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे भुईंज येथील दिनबंधु गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करून या चळवळीत प्रत्यक्ष योगदान दिलेच शिवाय आपले दिनबंधु हे नावही सार्थ केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुईंज फुलेनगर येथील महात्मा फुले सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा ७२ वा प्रजासत्ताक दिन असल्याने तेवढया रक्तदात्यांनी रक्तदान करावे असा संकल्प करण्यात आला होता, अशी माहिती बाबासाहेब झोरे यांनी दिली.

शिबिरस्थळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, सुधीर भोसले पाटील, आ. श्री. छ. शिवेन्द्रसिंहराजे भोसले यांचे स्वीय सहायक महेंद्रआबा जाधव, कृषिभूषण राजेंद्र गायकवाड, ग्रा. पं. सदस्य नारायण नलवडे, ईशान भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह जगन्नाथ दगडे, भुईंज प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ, प्रसिद्ध निवेदक दत्तात्रय शेवते, प्रयोगशील शेतकरी विनोद अडसूळ, संभाजी शेवते, भुईंज ऍक्टिव्हिटी क्लबचे अध्यक्ष महेश जाधवराव, सागर दळवी,  अमोल शेवते, अनिल शेवते, विलास शेवते, मुन्ना मिस्त्री, आशा स्वयंसेविका सौ. अर्चना झोरे, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बालाजी ब्लड बँकेसह शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल बाबासाहेब झोरे यांनी सर्वांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!