
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | फलटण ते बारामती या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि. 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबाबत फलटण रेल्वे स्टेशनवर भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे; तरी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार सर्व फलटणकरांनी व्हावे; असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
