
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, भाडळी, दि. ३१ मे : भाडळी येथील ज्येष्ठ रहिवासी आणि वृत्तपत्र विक्रेते गोपीनाथ डांगे यांचे वडील अण्णा बाजीराव डांगे (नाना) यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
अण्णा डांगे यांनी फलटण येथे असणाऱ्या जिनिंगमध्ये अनेक वर्षे कामकाज केले होते. त्यांच्या पश्चात ४ मुले, १ मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
