दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील राजीव गांधी वसाहत, लक्ष्मीनगर येथे दि. ३ जुलै २०२४ रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायलवरून आलेल्या तिघांनी गाडीचा कट का मारतोस, असे म्हणत लोखंडी गज, विटा, दगड व फरशीच्या तुकड्यांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत शिवकुमार रामदास चौधरी (वय २३ वर्षे, राहणार लक्ष्मीनगर फलटण) हे जखमी झाले असून याची फिर्याद मनोज बबन आडके (रा. झोपडपट्टी लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.
सोनू उर्फ परवेज समीर पठाण (वय २२ वर्षे, रा. राममंदिरा शेजारी, कसबा पेठ, फलटण) यास पोलिसांनी अटक केली असून सोहेल अलताफ इनामदार (वय १७ वर्षे, राहणार हरिबुवा मंदिराचे मागे, मलटण) व आदिल सय्यद (राहणार हडपसर, पुणे) यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.
अधिक तपास म पो. हवालदार पूनम बोबडे करत आहेत.