
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. २९ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुमन रमेश पवार यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने प्रभागात जोरदार जनसंपर्क वाढवला आहे. त्या स्वतः आणि कार्यकर्ते नागरिकांना भेटून शिवसेनेला मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.
या भेटींदरम्यान सौ. सुमन पवार प्रभागातील समस्या, त्यावरचे ठोस उपाय यावर विशेष भर देत आहेत. त्यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे की, निवडून आल्यास मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मतदारांना मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभागाचा विकास अखंड ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
एकंदरीत, सौ. सुमन पवार यांनी थेट संपर्क साधून आणि समस्यांवर उपाययोजना करण्याची भूमिका घेऊन आपला प्रचार मजबूत केला आहे.





